जामनेरात शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती
जामनेर (प्रतिनिधी) : जामनेरसह जळगाव शहराची तहान भागवणारे वाघुर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या पत्नी जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांचेसह हिवरखेडा येथे जाऊन विधिवत वाघुर जलाशयाचे जलपूजन केले.
या जलाशयामुळे परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पूर्णपणे मिटला आहे. याप्रसंगी जि. प सीईओ अंकित, तहसिलदार नानासाहेब आगळे , उपअभियंता पाटील, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांचेसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.