भडगाव :- वडजी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी परिवर्तन पॅनलच्या मनिषा विजय गायकवाड, उपसरपंच पदी सुरेखा सुधाकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणुकीत परिवर्तन पॅनल ने १३ पैकी ८ जागा जिंकत वर्चस्व सिध्द केले होते. सरपंचपद हे अनुसुचित जमातीसाठी प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे सरपंच पदासाठी मनिषा गायकवाड यांनी तर उपसरपंच पदासाठी सुरेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असता त्यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी विजय कुमावत यांनी ही निवड घोषीत केली.
———————-