नाशिक (वृत्तसंस्था) – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. ‘राजकारणात एखाद्या व्यक्तीचा बळी घेणं, बदनाम करणं असे प्रकार वाढले आहे. यामुळे सरकारला त्रास होईल असे विरोधकांना वाटत आहे. पण विरोधी पक्षाने ठरवले म्हणून त्या दिशेने चौकशी करायची असे होत नाही’, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी रोखठोक मत व्यक्त केले.’धनंजय मुंडे यांचा विषय वेगळा आहे. तक्रारदार महिलेने तक्रार मागे घेतली. त्यामुळे सर्व आरोप हे खोटे ठरले होते.
संजय राठोड यांच्या विषयी बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पण राजकारणात एखाद्या व्यक्तीच्या बळी घेणं, बदनाम करणं असे प्रकार वाढले आहे. यामुळे सरकारला त्रास होईल असं विरोधकांना वाटत आहे’ असा टोला राऊत यांनी लगावला.