जळगाव येथे सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- वडिलांच्या उपचारासाठी रुग्णालयाची अपॉइंटमेंट घेणेंसाठी ऑनलाईन नम्बर शोधणे तरुणांना महागात पडले आहे. अनोळखी नम्बरवरून सायबर ठगांनी त्या तरुणाला एक फाईल पाठवून व बँक खात्याची माहिती घेऊन तरुणाची १० लाख रुपयांनी फसवणूक केली. दि. ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर येथील खासगी क्लासेस चालक असलेले विश्वेष प्रदीप बाविस्कर (३३, रा. जामनेर) यांचे वडील प्रदीप बाविस्कर यांच्या उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयाच्या क्रमांक हवा होता. अपॉईंटमेंटसाठी त्यासाठी त्यांनी इंटरनेटवर ऑनलाइन हा क्रमांक शोधला. त्यानंतर त्यांना डॉ. राकेश असे नाव सांगणाऱ्याने त्यांच्याशी संपर्क साधून अपॉईंटमेंटसाठी एक फाईल पाठविली. तसेच प्रदीप बाविस्कर यांचा बैंक खाते क्रमांक, एटीएम कार्ड क्रमांक व सीव्हीव्ही क्रमांक अशी सर्व माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून १० लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विश्वेष बाविस्कर यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संपर्क साधणाऱ्या अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.