चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वडाळा शेत शिवार मधून अज्ञात चोरट्यांनी साठ हजार रुपये किमतीच्या दोन गाई चोरून नेल्याची घटना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील वाघळी येथील शेतकरी गौरव माळी यांचे वडाळा शिवरात शेत गट क्रमांक २८८ मध्ये शेत असून या शेतात बांधलेल्या प्रत्येकी ३० हजार रुपये किमतीच्या दोन गाई असा एकूण साठ हजार रुपयांचा गाई अज्ञात चोरट्यांनी २० ऑगस्ट सायंकाळी सहा ते २१ ऑगस्ट सकाळी सहा वाजे दरम्यान चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्याने गौरव माळी यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहे.