• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

शेतकरी आत्महत्या हे ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणाचे पाप! -खा. उन्मेष पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 8, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी ) – महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा देशात सर्वाधिक असताना डोळ्यावर कातडे पांघरून वसुलीबाजांची पाठराखण करणारे आता सत्ता गेल्यावर जागे झाले आहेत. राज्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढल्याबद्दल चिंता व्यक्त करणारे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना हा आकडा आपल्या सत्ताकाळातील असल्याचा विसर पडला आहे. महाविकास आघाडीच्या अपयशाचे खापर युती सरकारवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न अजितदादा करत आहेत, असा आरोप भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

 

राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्याचे अजितदादा म्हणाले, ते खरे आहे. पण हा आकडा महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या काळातील होता हे सत्य त्यांनी दडविले आहे. सन २०२०-२१ मध्ये देशात घडलेल्या आत्महत्यांपैकी सर्वाधिक म्हणजे २५६७ घटना ह्या एकट्या महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे सरकारमध्ये आपण उपमुख्यमंत्री होतो हे आता अजितदादा विसरूनदेखील गेले आहेत, असा टोला खासदार उन्मेश पाटील यांनी मारला. शेतकरी आत्महत्यांची ही आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंद संस्थेने (एनसीबीआर) अधिकृतपणे जाहीर केली आहे, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या सहा महिन्यांतच महाराष्ट्रातील आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक वाढले होते. जानेवारी ते जून २०२२ या सहा महिन्यात एकट्या मराठवाड्यातच साडेपाचशे शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली होती. तेव्हा ठाकरे सरकारने केवळ कागदावर जाहीर केलेली कर्जमुक्ती योजना कृतीत आणली नाही म्हणूनच शेतकऱ्याच्या डोक्यावरील समस्यांचे ओझे संपले नाही, असा आरोपही त्यांनी केला.

 

शेतकऱ्याला नगदी पिकांच्या मोहात अडकवून पारंपरिक शेती उद्ध्वस्त करणाऱ्या चुकीच्या कॉंग्रेसी कृषी धोरणामुळेच शेतकऱ्याच्या समस्या वाढल्या असा दावा खासदार उन्मेश पाटील यांनी केला. या दुष्टचक्रातून शेतकऱ्यास बाहेर काढण्याकरिता शिंदे-फडणवीस सरकार योग्य दीर्घकालीन उपाययोजना आखत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. २५ लाख हेक्टरवर नैसर्गिक शेती व गावे जलसमृद्ध करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतल्याबद्दल खासदार उन्मेश पाटील यांनी सरकारचे अभिनंदन केले. शेतकरी आत्महत्या हा संवेदनशील विषय असून समस्याग्रस्त शेतकऱ्यांना कृतीशील सहकार्याची गरज आहे, त्यामुळे अजितदादांनी या प्रश्नावर राजकारण न करता ठाकरे सरकारच्या चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही खासदार उन्मेश पाटील यांनी केले.

 

 


 

Tags: #unmeshpatil #chalisgaon #bjp #shetkariatmhatya
Previous Post

भुसावळच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे  अवैध दारू भट्टीचे कारखाने उध्वस्थ

Next Post

आदिवासी क्रांतीकारकांच्या बलिदानापासून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी – ना. डॉ.विजयकुमार गावित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आदिवासी क्रांतीकारकांच्या बलिदानापासून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी - ना. डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon