भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील एकही रस्ता दुरुस्त करण्याचे अशिष्टता नगरपरिषदेने दाखवले नाही. गेल्या साडेचार वर्षांपासून या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्तांची चाळणी झाली आहे. या रस्तांचे तात्काळ काम करण्यात यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केली आहे. अन्यथा रस्त्यातील खड्ड्यात बसून आंदोलन करुन, अशा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.
तसेच चुकीच्या पद्धतीने अमृत योजना लागू केली तेव्हापासून रस्त्यांची चाळण झालीय. रस्त्यात धड पाय सुद्धा ठेवतांना प्रश्न पडत आहे की पाय कुठे ठेवायाचा असं. दरम्यान पावसाळ्यात अनेक ठिकाणी मोठे मोठे डबके साचले असताना जनतेला आणि नागरिकांना यापासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील रस्त्यांच्या आणि डोक्यांच्या चित्रांवर संपूर्ण देशभर सोशल मीडियातून टिंगल उडवली गेली. भुसावळ शहराचे नाव धुळीस मिळवण्याचा मोठं काम येथील सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनाच्या माध्यमातून झालेले आहे. फक्त पैसे कमवण्याच्या मार्गातून यांनी मुरूम टाकण्याचे काम सुरू केल्याचे दिसते. असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी असेच एक लाख रुपयाचा मुरूम शहरात टाकून ४० लाख रुपयांचे बिल तयार करून सक्तीने अधिकाऱ्यांकडून काढून घेतले, अशी चर्चा संपूर्ण नगर परिषदेतून शहरभर होताना दिसते. जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसात रस्त्यांची डाग करा असे आदेश दिलेले असतानासुद्धा जिल्हाधिकारी यांचा सुद्धा अवमान करणे सोडले नाही. यांनी खड्ड्यांमध्ये घर पाडण्याच्या रॅबिट मे खड्डे बुजवण्याचे महापाप केलं. अनेक वेळा आवाज उठवलेला असताना यांनी त्या-त्या वेळी रस्त्यांच्या निविदा काढून जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केलं. संपूर्ण शहरांमध्ये ते पाण्याच्या डबक्यात मध्ये डेंगूचे मच्छर झाल्याचे असल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित हे सुस्त आणि कुंभकर्णी झोप असलेल्या सत्ताधारी आणि प्रशासनाला जनतेच्या जीवाशी खेळण्याचा एकमेव काम या ठिकाणी करीत आहे. आता तरी जागे व्हा व आणि या शहरातील रस्ते एक महिन्याच्या आत सुरू करावी, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेऊन भुसावळ शहरातील रस्त्यांच्या खड्डयात बसून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे.