बुलढाण्यातून नरेंद्र खेडकर, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, संभाजीनगर चंद्रकांत खैरे लढणार
मुंबई (प्रतिनिधी) :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी पहिल्या फेरीत १६ उमेदवारांची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यात जळगावच्या उमेदवाराचे नाव सस्पेन्स राहिले असून नाशिकसाठी राजाभाऊ वाजे, बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर तर संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे हे प्रतिस्पर्धी उमेदवाराला तुल्यबळ लढत देणार आहेत.
जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये यवतमाळ वाशिम मतदारसंघातून संजय देशमुख, मावळ मतदार संघातून संजोग वाघेरे पाटील, सांगलीमधून चंद्रहार पाटील, हिंगोली मधून नागेश पाटील आष्टीकर, धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर, शिर्डी मतदार संघातून भाऊसाहेब वाघचौरे, रायगड येथून अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून विनायक राऊत, ठाणे येथून राजन विचारे यांच्यासह परभणी येथून संजय जाधव यांना संधी देण्यात आली आहे.
तसेच मुंबईतील मुंबई ईशान्य मतदारसंघातून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत तर मुंबई वायव्य मधून अमोल कीर्तीकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणखी दुसऱ्या फेरीत सहा जागांची घोषणा होणार आहे. त्यात जळगावच्या नावाबाबत उत्सुकता लागून राहणार आहे.