जळगाव (प्रतिनिधी) : येथील यशवंत नगरातील २२ वर्षीय तरुणाने रविवारी संध्याकाळी गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लक्षीत राजेंद्र वाघुळदे (२२) असे मयत तरुणाचे नाव आहे.यशवंत नगरातील लक्षीत वाघुळदे हा तरुण पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो तर त्याचे वडील सेंट जोसेफ शाळेत शिक्षक आहे. सध्या सुटी असल्यामुळे लक्षीत हा काही दिवसांपूर्वी घरी आला होता. रविवारी वरील मजल्यावर एकटाच असताना त्याने गळफास घेतला. त्याचे कुटुंबिय त्याला बोलविण्यासाठी गेले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषीत केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्या का केली याबाबत कारण अस्पष्ट आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.