जळगाव शहरात शनिपेठ पोलीस स्टेशनची कारवाई
अनिता मनोज चव्हाण (५०, रा. काट्या फाईल) यांना घरी असताना त्यांच्या घरासमोर शेखर भारोटे हा हातात तलवार घेऊन आला व अश्लील शिवीगाळ करू लागला. तुझ्या पती व मुलाला घराबाहेर काढ, त्यांना मारून टाकतो, अशी धमकी दिली. त्यावेळी आजूबाजूचे काही जण तेथे आले असता धमकी देणारा पळून गेला. या प्रकरणी अनिता चव्हाण यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शेखर भारोटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले.