• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर ” ट्रामा केअर सेंटर “

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2020
in जळगाव
0

प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

जळगाव (प्रतिनिधी) – रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर एरंडोल अथवा पारोळा याठिकाणी ट्रामा केअर सेंटर उभारण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागास तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेत.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी. एम. सिन्हा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुनगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनग्रा, उप अभियंता श्रीमती स्वाती भिरुड यांचेसह महापालिका, एसटी आदि विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राऊत पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, मोठ्या आस्थापना, एमआयडीसीमधील उद्योग, बँका, विद्यापीठ, महाविद्यालयात विविध कामासाठी येणारे नागरीक, विद्यार्थी यांना नो हेल्मेट, नो एंन्ट्री हे तत्व अवलंबण्याच्या सुचना द्याव्यात. यासाठी या सर्व आस्थापनांना तसे लेखी निर्देश देण्यात यावेत. त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या बसेस ह्या थांब्यावर न थांबता इतरत्र थांबतात. त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा यापुढे बसेस ह्या थांब्यावरच थांबविण्याच्या सुचना देण्यात आल्यात. महामार्गावर ओव्हरटेक करताना अनेक अपघात होतात याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने अपघाताची स्थळे दर्शविणारे फलक रस्त्यांवर तात्काळ लावण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण 23 टक्क्यांनी घटले आहे. ऑगस्ट -2019 पर्यंत जिल्ह्यात 589 अपघातात 308 व्यक्तींचा मृत्यु झाला होता तर 593 व्यक्ती जखमी झाल्या होत्या. ऑगस्ट-2020 मध्ये 453 अपघात झाले असून यात 301 व्यक्तींचा मृत्यु झाला आहे तर 332 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत 106 अपघात झाले आहे. सर्वाधिक 12 अपघात हे पारोळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाले आहे तर त्यानंतर चाळीसगाव ग्रामीण 11, मेहुणबारे, जळगाव एमआयडीसी हद्दीत प्रत्येकी 10 अपघात झाले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी बैठकीत दिली.
झालेल्या अपघातांच्या ठिकाणांचे निरिक्षण करुन वारंवार एकाच ठिकाणी अपघात होत असतील तर ते ठिकाण ब्लॅक स्पॉट ठरविण्यासाठी त्यांची संयुक्तपणे पाहणी करण्याच्या सुचनाही बैठकीत देण्यात आल्यात. तरसोद-चिखली रस्त्यांचे काम गतीने सुरु असून फागणे-नशिराबाद रस्त्याचे कामही वेगाने पूर्ण करावेत. काम सुरु असतांना वाहनचालकांसाठी आवश्यक त्या सुचना, चिन्हे रस्त्यावर लावण्याचे निर्देशही देण्यात आले. महानगरपालिका हद्दीतील रसत्याच्या मधोमध अथवा कडेला असलेल्या इलेक्ट्रिक पोल स्थलांतर करणे, सदोष वाहनांवर कारवाई करणे, त्याचबरोबर जळगाव-धुळे रस्त्यांवरील खड्डे राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्वरीत भरण्यात यावेत. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्यांवर झाडांच्या फांद्या वाढल्यामुळे अपघात होतात यावरही कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांना बैठकीत देण्यात आल्यात.


 

 

Previous Post

बोदवड तालुक्यातील कोल्हाडीचा “एनओसी” रद्द ; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Next Post

वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची पुढील महिन्यात होणार परीक्षा ; विद्यापीठातर्फे तारखा जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची पुढील महिन्यात होणार परीक्षा ; विद्यापीठातर्फे तारखा जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon