धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावानजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी शनिवारी १५ जुलै रोजी रात्री १० वाजता धरणगाव पोलीस स्टेशनला ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील एकलग्न गावानजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक (जीजे १७ एक्स १७६४) वरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक डिव्हायडर ओलांडून स्वीफ्ट कार (क्रमांक एकएच १९ बीयू १८४५) ला जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी १४ जुलै रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात कार चालक चंद्रशेखर द्वारकादास पालीवाल (वय-५७) रा. मुक्ताईनगर, जळगाव हे गंभीर जखमी झाला आहे. तसेच कारचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान जखमी चालकाला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी चंद्रशेख पालीवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्टेशनला ट्रकवरील चालक सलमान समद पठाणे रा. गोध्रा राज्य गुजरात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय चौधरी करीत आहे.