चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी ट्रॅक्टर चोरीची फिर्याद दाखल झाली होती. पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत २४ तासांत संशयित चोराला अटक केली आहे.
ट्रॅक्टर मालक गणेश गोविंदराव झेंडे (वय ३५) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती काढली. त्यानुसार संशयित आरोपी प्रेमसिंग देवराम पावरा (रा. मध्यप्रदेश) याला अटक केली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, सहा पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप पाटील, पोहेकॉ प्रशांत पाटील, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे अशा पथकाने केली.









