जळगाव (प्रतिनिधी) :- खान्देश तेली समाज सेवा संस्था जळगाव आयोजित राज्यस्तरीय वधु वर सूची २०२३-२४ चे फॉर्म सर्व समाज बंधू-भगिनींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. खेडी रोड येथील संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज उद्यान येथे फॉर्मचे प्रकाशन करण्यात आले. वधू-वर सूची १४ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात येणार असून फॉर्म मधील संपूर्ण माहिती भरून संस्थेच्या गणेशवाडी येथिल कार्यालयात भरून पाठवावा असे आवाहन आयोजक खान्देश तेली समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष डी. ओ. चौधरी यांनी केले,
या प्रसंगी संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था, तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ, संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय युवक मंडळ शनीपेठ, भुसावळ तेली समाज संस्था, तसेच खान्देश तेली समाज सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी व समाज बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. हा पालक मेळावा यशस्वी करण्याचे सर्व तेली समाज संस्थानांचे अध्यक्ष , सचिव व पदाधिकारी यांनी एकमताने सहमती देवून सहभाग नोंदविण्याचे सर्व समाज बांधवांना आवाहन केले.