• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

तरुण गायकांच्या प्रतिभेतून रंगली “तेज-गंधर्व” शास्त्रीय संगीत स्पर्धा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 29, 2023
in खान्देश, जळगाव
0

लहान गटातून छ. संभाजीनगरची युगंधरा तर मोठ्या गटातून लातूरचा सचिन प्रथम

जळगाव (प्रतिनिधी) :-  भीमपलास,  आसावरी, वृंदावन सारंग, यमन,  बागेश्री अशा विविध रागांचा वापर करून छोटाख्याल, बडाख्याल सादर करीत अनेक युवा विद्यार्थ्यांनी दिवंगत तेजस नाईक स्मरणार्थ आयोजित  “तेज-गंधर्व” या स्पर्धेमध्ये रविवारी दि. २९ ऑक्टोबर रोजी रंगत आणली. या स्पर्धेमध्ये लहान गटात छत्रपती संभाजीनगरची युगंधरा केचे हिने  प्रथम तर मोठ्या गटात लातूरचा सचिन जाधव याने प्रथम क्रमांक मिळविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

कान्ह ललित कला केंद्रच्या स्वरदा संगीत विभागातर्फे आयोजित दिवंगत तेजस नाईक स्मरणार्थ शास्त्रीय गायन स्पर्धा रविवारी २९ ऑक्टोबर रोजी मु.जे. महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यंदा स्पर्धेचे तिसरे वर्ष होते. उदघाटनावेळी मंचावर केसीई संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्राचार्य स. ना. भारंबे, तेजसचे वडील नितीन नाईक व आई सुवर्णा नाईक, संगीत विभाग प्रमुख प्रा. कपिल शिंगाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन केले. शास्त्रीय संगीत प्रत्येकांपर्यत पोहोचावे, ते रुजू व्हावे व आत्मसात देखील व्हावे या उद्देशातून स्पर्धा आयोजित होत असते असे प्रस्तावनेतून कपिल शिंगाणे यांनी सांगितले.

दिवंगत तेजस नाईकने लहानश्या आयुष्यात शास्त्रीय संगीतावर भरभरून प्रेम केले. त्याची स्मृती कायम राहावी, उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन मिळावे याकरिता स्पर्धा आयोजित केल्याचे तेजसचे वडील नितीन नाईक यांनी सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. भारंबे यांनी, विद्यार्थ्यांनी संगीत क्षेत्रात संधी व प्रोत्साहन मिळाले की पुढे जात राहावे. कलेची आवड जोपासत शास्त्रीय संगीताचा देशाचा वारसा अधिक उज्ज्वल करावा, असे सांगितले. यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध गायक व संगीतकार ज्ञानेश्वर कासार व संगीतकार मनोज कुलकर्णी यांनी केले.

स्पर्धेत ८ ते १५ वर्षांचा लहान गट व १६ ते २८ वर्षाचा मोठा गट सहभागी होता. लहान गटासाठी फक्त छोटाख्याल तर मोठ्या गटासाठी बडाख्याल व छोटाख्याल सादर करायचा होता. संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  चांदोरकर प्रतिष्ठानचे दीपक चांदोरकर, अड. प्रवीणचंद्र जंगले, शशिकांत वडोदकर, प्राचार्य एस.एन. भारंबे उपस्थित होते. शास्त्रीय संगीताची आवड जिवंत ठेऊन विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पुढे जावे, असे प्रतिपादन दीपक चांदोरकर यांनी व्यक्त केले. स्पर्धेत राज्यभरातून लहान गटात १५ तर मोठ्या गटात २२ युवा गायकांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन् गोपीचंद धनगर यांनी करून आभार मानले. स्पर्धेसाठी प्रा. देवेंद्र गुरव, भूषण काटोले, महिमा परदेशी, चेतना पाटकरी, ऋषिकेश तायडे, स्वरांजली पाटील यांच्यासह ईशान नाईक आदींनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल :
लहान गट –
प्रथम : युगंधरा गजानन केचे (छ. संभाजीनगर)
द्वितीय : मानस गोपाल पाटील (जळगाव)
तृतीय : संयम गोकुळ खैरनार (मालेगाव)
उत्तेजनार्थ : पवित्र महेश कवडे (नंदुरबार)

मोठा गट –
प्रथम : सचिन सूर्यकांत जाधव (लातूर)
द्वितीय : ऋषिकेश अशोक पवार (छ. संभाजीनगर)
तृतीय : मंगेश शंकरराव वाघ (जळगाव)
उत्तेजनार्थ : आदिनाथ शरद धुमाळे (अकोला)

अंध आजोबा अन् आईच्या साथसंगतीने ‘वृंदावन सारंग’चा “लौकिक”..!

स्पर्धेमध्ये लहान गटातून वरणगाव येथील लौकिक पंकज पाटील याने वृंदावन सारंग या रागात छोटाख्याल सादर केला. यावेळी हार्मोनियमवर त्याची आई रुचिता पाटील यांनी तर त्याचे आजोबा धनंजय नेहेते यांनी तबल्यावर साथसंगत केली. विशेष बाब म्हणजे धनंजय नेहेते हे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अंध असून त्यांनी नातवाच्या प्रेमापोटी स्पर्धेत साथसंगत केल्याचे पाहायला मिळाले. लहानपणापासून धनंजय नेहेते हे तबलावादन शिकले आहे. तर त्यांनी रावेर तालुक्यातील खिरोदा येथे धनाजी चौधरी संस्थेच्या विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून काम केले आहे.


Tags: #jalgaon newshttps://kesariraj.com/tej-gandharva-shashriy-sangit/
Previous Post

किरकोळ कारणावरून एकाला जबर मारहाण

Next Post

धक्कादायक, अतिक्रमणधारकांनी डॉक्टरांचे वाहन फोडून केली जबर मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धक्कादायक, अतिक्रमणधारकांनी डॉक्टरांचे वाहन फोडून केली जबर मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते
1xbet russia

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

नेत्रशक्ती देताना माणुसकीची दृष्टी जपली : पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 31, 2025
महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा
1xbet russia

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

May 31, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

गाडेगावच्या तरुणाचा मृतदेह नशिराबादला विहिरीत आढळला

May 31, 2025
“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

May 31, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon