पुणे( प्रतिनिधी ) – कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात नेऊन एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन बजरंग जयवंत रुमाले (वय-21) आणि त्याच्या मित्राविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणीचे आजोबा नांदेड येथे राहायला होते. आजोबांचे निधन झाल्याने ती मे 2023 मध्ये नांदेडला गेली होती. नांदेड येथे आरोपी रुमाले याच्यासोबत तिची ओळख झाली. त्यानंतर तरुणी पुण्यात परतली. तरुणीच्या पाठोपाठ आरोपी रुमाले आणि त्याचा मित्र पुण्यात आले.
आरोपींनी पीडीत तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली.
तरुणीला धमकावून रुमाले याने बोपदेव घाटात घेऊन गेला. आरोपींनी तिच्यावर अत्याचार करुन अनैसर्गिक कृत्य केले. पीडीत तरुणीने कोंढवा पोलिसांकडे तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबर करत आहेत.