भुसावळ ( प्रतिनिधी ) – येथे माहेर असणार्या तरूणीला तिच्या पतीने मोबाईलवरून तोंडी तिहेरी तलाक देण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिच्या पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शहरातील रहिवासी तरूणीचा हिंगोली येथील तरूणाशी विवाह झाला होता. काही दिवसांमध्येच तिचा छळ सुरू झाला. काही महिन्यांपासून आपल्याला व्यापार करायचा असल्याने माहेराहून एक लाख रूपये घेऊन ये अशी मागणी तिला करण्यात आली. पती आणि सासरच्या मंडळीने तिला त्रास देण्यास प्रारंभ केला.
काही दिवसांपूर्वी पतीने शालकाच्या मोबाईलवर फोन करून तीनदा तलाक बोलून तिहेरी तलाक देण्याचा प्रयत्न केला. संबंधीत महिलेने हिंगोली पोलीस स्थानकामध्ये तक्रार दिली आहे. पती मोईन हबीब गवळी, सासरे हबीब गवळी, सासू नजमा हबीब गवळी, अख्तर हबीब गवळी, शन्नो अख्तर गवळी आणि नसीम या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







