एमआयडीसी पोलीस स्टेशनची मेहरूण परिसरात कारवाई

यामुळे पोलिसांनी संशयित आरोपी साहिल मोहम्मद तडवी (वय २२, रा. मच्छी बाजार, तांबापुरा, जळगाव) याला ताब्यात घेतले तर त्याच्यासोबत असणारा दीपक शांताराम रेणुके (वय २१ रा. तांबापुरा,जळगाव) याची देखील चौकशी करण्यात येऊन ताब्यात घेण्यात आले.(केसीएन)पोलिसांनी १५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल तसेच मॅक्झिनमधील २ जिवंत काडतूस याशिवाय १०० रुपये किमतीचा १ ग्रॅम वजनाचा गांजा व त्यासाठी लागणारे चिलम असा एकूण १६ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून साहिल मोहम्मद तडवी, दीपक रेणुके याला अटक करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर, गणेश ठाकरे, चंद्रकांत पाटील, बागवान अशांनी केली आहे.