यावल तालुक्यातील न्हावी येथील घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील न्हावी या गावातील शेत शिवारात शेतात बांधलेले घर खाली करण्याच्या कारणावरून वाद झाला व घर खाली केले नाही या रागातून तिघांनी तरुणाला जातिवाचक शिवीगाळ केली आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणाविरुद्ध अॅट्रॉसिटी सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्हावी ता. यावल या गावातील शेतकरी सुधीर झोपे यांच्या शेतात एक घर आहे. या घरात रामदास जितेंद्र भिलाला (वय १८) हा तरुण राहत होता. या तरुणाला त्यांनी घर खाली करण्याचे सांगितले होते. मात्र त्याने घर खाली केले नाही. म्हणून सुधीर चंद्रकांत झोपे, किरण बोरोले, यशवंत उर्फ येशु गाजरे या तिघांनी त्याला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात शीला कैलास भिलाला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनोदिन सय्यद करीत आहे.