जळगाव शहरातील कंजरवाडा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील कंजरवाडा परिसरामध्ये घराबाहेर ‘एसी’च्या आऊट डोअरला वायरने गळफास घेत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दि. ११ जुलै पहाटे घडली. मयताच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यावर पत्नीसह सासरच्या मंडळींचे नावे असून कौटुंबिक वादातून प्रमोद यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मयताची आई व पुतण्याने केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रमोद गुंड्या माचरेकर (३८, रा. कंजरवाडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होते. प्रमोद माचरेकर हे पत्नी, दोन मुली, एक मुलगा व आईसह कंजरवाडा परिसरात राहत होते.(केसीएन)घरात सर्व सदस्य झोपलेले असताना गुरुवारी पहाटे त्यांनी घराला लागून असलेल्या छोट्याशा बोळीत जाऊन तेथे वातानुकुलीत यंत्राच्या (एसी) आऊट डोअरच्या ॲंगलला वायरने गळफास घेतला.
सकाळी त्यांची मुलगी तिकडे गेली. या वेळी तिला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. तिने कुटुंबीयांना या विषयी माहिती दिली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. (केसीएन)प्रमोद माचरेकर यांचा पत्नी व सासरच्या मंडळींशी वाद सुरू होता व त्यातून त्यांनी आपले जीवन संपविल्याचा आरोप मयताची आई व पुतणे जयेश माचरेकर यांनी केला आहे.
त्यांच्या खिशात एका चिठ्ठीवर सात जणांचे नावं त्यांनी लिहून ठेवल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. याबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पोलीस कसून तपास करीत आहेत.