शहरातील खंडेराव नगर परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील खंडेराव नगर परिसरातील बाजूस बुधवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेल्वे ट्रॅकच्या बाजुला शौचालयाला गेले असताना हि घटना घडली आहे.
भावेश मुरलीधर सोनार (वय २८, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. भावेश सोनार हा युवक आपल्या आई, वडिल व मोठ्या भावासह वास्तव्याला होता. बुधवारी १२ जुलै रोजी रात्री घरी आल्यानंतर ९ वाजेच्या सुमारास घरातून शौचालयासाठी निघाला. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास आत्महत्या कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅकलगत रेल्वेचा धक्का लागल्याने भावेशचा मृत्यू झाला.
याबाबतची माहिती रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या काही युवकांनी रात्री पोलीसांना दिली. हरिविठ्ठल नगरातील काही युवकांनी मृतदेह पाहिल्यानंतर भावेशची ओळख पटल्यानंतर भावेशच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.