चाळीसगाव शहरातील पंचायत समिती येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील पंचायत समिती परिसरात कामानिमित्त आलेल्या एका तरूणाचा दीड लाख रूपये किंमतीचा मोबाईल हरवला. तरूणाने तत्काळ पोलिसांशी संपर्क करुन तक्रार नोंद केली. पोलिसांनी अवघ्या ४ तासात तरूणाला हा मोबाईल शोधून दिल्याने त्याने पोलिसांचे आभार मानले आहेत.
शहरातील पंचायत समिती परिसरात ललित मांडोळे हा तरूण काही कामानिमित्त आलेला होता. या वेळी त्याच्या जवळील दीड लाख रूपये किमतीचा अॅपल कंपनीचा मोबाईल गहाळ झाला. ललितने सर्वत्र मोबाईलचा शोध घेतला, मात्र तो न मिळाल्याने शहर पोलिस स्थानकात मोबाईल गहाळ झाल्याची त्याने तक्रार दिली.
पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉस्टेबल अजय पाटील, अमोल भोसले, शरद पाटील, मोहन सूर्यवंशी, नंदकिशोर महाजन यांनी तपासचक्र फिरवत अवघ्या ४ तासात मोबाईलचा शोध घेतला. त्यानंतर ललित मांडोळे याला मोबाईल परत केला. यामुळे तरुणाने पोलिसांच्या आभार मानले आहे.