• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळ, न्यायप्रविष्ठ प्रकरणात दोषी धरून तरुणाला बेदम मारहाण करीत संपविले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 7, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अहमदाबादचा फरार खुनाचा आरोपी चाळीसगाव पोलिसांनी शिताफीने पकडला

चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील घटना, ११ जणांना अटक

चोपडा (प्रतिनिधी) :- जुन्या वादातून जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत एका ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात ११ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

सुरेश ओंकार बारेला (वय ३६ वर्षे, रा. बडवाणी ता. चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे. शिवा ओंकार बारेला (वय ३२ वर्षे,बडवाणी, (पाडा) पोस्ट बिडगांव, ता. चोपडा) यांनी फिर्याद दिली आहे. चोपडा ग्रामिण पोलीस येथे सदरील घटनेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश ओंकार बारेला हा सुमारे २ ते ३ वर्षापासुन त्याची पत्नी आशाबाई व त्याची दोन मुले सचिन, रोहन अशांसह बडवाणी, (पाडा) पोस्ट बिडगांव, येथे राहण्यास आहे. त्यापुर्वी ते सुमारे १० ते १५ वर्ष कामानिमित्त वैजापुर, ता. चोपडा येथे राहत होते.(केसीएन) २ ते ३ वर्षापुर्वी मयत सुरेश हा वैजापुर येथे राहत असतांना तो महेंद्रा पिकअप गाडी चालवित होता. त्यावेळेस त्याचे गाडीमध्ये वैजापुर येथील १० मुलांना तो काहीतरी कामासाठी मध्यप्रदेश राज्यात घेवुन जात होता. तेव्हा त्याची पिकअप गाडी पलटी होवून अपघात झाला होता. त्यामध्ये सदर गाडीमधील ०४ मुलांचा मृत्यु झाला होता. तेव्हा त्याचेवर वरला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून त्या प्रकरणात त्याचा सेंधवा कोर्टात खटला सुरु आहे.

दि. ०६ डिसेंबर रोजी सेंधवा येथे सुरेश याची कोर्टात तारीख असल्याने सकाळी ०९:०० वा. फिर्यादी शिवा व त्यांचा मोठा भाऊ सुरेश असे हे दोन्ही सुरेश याचे होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल क्रमांक (एमएच १९ ईएल ६४३०) ने गेले होते. वैजापुर मार्गाने जात असताना ११:३० ते १२:०० वा.चे सुमारास ते वैजापुर येथे थांबले. वैजापुर गावात मेन चौकाचे बाजुला वैजापुर ते गेरूघाटी जाणारे डांबरी रोडवर गोटु रामचंद्र भिल याचे घरासमोर ते पाणी पीत होते. त्याठिकाणी हजर असलेला वैजापुर येथील सुरेश अंगल्या बारेला हा मयत सुरेशला म्हणाला की, मागील २ ते ३ वर्षापूर्वी मध्यप्रदेशात तुझ्या गाडीने आमचे लोक घेवुन जात असतांना मयत झाले आहेत.(केसीएन)तरीपण तु एवढा बिंदास आणि मजेत गावात फिरत आहेस असे म्हणुन त्याने सुरेशला, आज तुला जिवंत ठेवतच नाही असे बोलून त्याचेशी वाद घालु लागला. त्यानंतर थोड्याच वेळात त्याठिकाणी वैजापुर येथील अशोक पहाडु कोळी, केरया रिशा वारेला, प्रविण गंभीर बारेला, बबीताबाई शांतीलाल बारेला, रेशमा प्रविण बारेला, पालीबाई वेरसिंग बारेला, कुसम केरया बारेला, धरमसिंग सिध्दार्थ वारेला, विजय वेरसिंग बारेला, शर्मिला धरमसिंग बारेला हे देखीलआले.

वरील सर्वांनी मिळून सुरेशसोबत मागील घडलेल्या अपघाताचे कारणावरून वाद करून बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. तेवढ्यात केरया रिशा बारेला याने त्याचे हातात असलेले लाकडी दांडके सुरेशच्या डोक्यावर जोरात मारून त्याला खाली पाडले व लाकडी दांडक्याने दोन्ही बरगड्यावर मारहाण केली.(केसीएन) तेथे हजर असलेले सुरेश झगल्या बारेला, विजय वेरसिंग बारेला, धरमसिंग सिध्दार्थ बारेला, प्रविण गंभीर बारेला अशांनी सुरेश यास उचलुन डांबरी रोडवर पटकुन पटकुन मारहाण केली. तसेच तेथे हजर असलेल्या चबीताबाई शांतीलाल बारेला, रेशमा प्रविण बारेला, पालीबाई वेरसिंग बारेला, कुसम केरया बारेला, शर्मिला धरमसिंग वारेला अशांनी शिवीगाळ करून चापटा बुक्यांनी पोटात, छातीवर व चेहर्यावर मारहाण केली.

फिर्यादी शिवा बारेला यांनी, माझ्या भावाला मारहाण करू नका असे सांगणेसाठी गेलो असता त्यातील सुरेश बारेला व केरया बारेला यांनी तु मध्ये पडु नको, तुझे पण असे हाल करून मारू असे म्हणल्याने फिर्यादी त्यांना घाबरून तेथेच लपुन पाहत होता. त्यानंतर कोणीतरी पोलीसांना माहीती दिल्याने काही वेळात तेथे पोलीस आले. (केसीएन)त्यांनी व वैजापुर येथील काही लोकांनी मिळून त्याला चोपडा सरकारी हॉस्पिटल येथील वाहनाने उपचारासाठी पाठवुन दिले. परंतु त्याची तब्येत जास्त सिरीयस असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारसाठी जळगाव येथे घेवुन जात असतांना तो रस्त्यातच मरण पावला. म्हणुन शिवा ओंकार बारेला यांनी वरील सर्व संशयित आरोपींविरुद्ध कायदेशीररीत्या फिर्याद दाखल केली असून सदरील घटनेतील संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भरधाव ट्रकने दुचाकीला दिली जबर धडक, साकेगावचा तरुण जागीच ठार

Next Post

अहमदाबादचा फरार खुनाचा आरोपी चाळीसगाव पोलिसांनी शिताफीने पकडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अहमदाबादचा फरार खुनाचा आरोपी चाळीसगाव पोलिसांनी शिताफीने पकडला

अहमदाबादचा फरार खुनाचा आरोपी चाळीसगाव पोलिसांनी शिताफीने पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon