जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील व.वा.वाचनालय गल्लीमध्ये किरकोळ कारणावरून तरूणाला शिवीगाळ करत मारहाण केली. दगडाने डोळ्यांवर आणि नाकांवर गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी दि. २९ मार्च रोजी दुपारी १ वाजता उघडकीला आली आहे. या संदर्भात सोमवारी ३१ मार्च रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैजाद नवरोज जलगाववाला (वय-३८, रा.नवीपेठ, जळगाव) हा तर कॉम्प्युटर रिपेरिंगचे काम करून उदरनिर्वाह करत असतो. शनिवारी २९ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील व.वा. वाचनालयच्या गल्लीत कैजाद हा पायी जात असतांना संशयित आरोपी गौरव अनिल चौधरी (रा. भाटिया गल्ली, धरणगाव) याने शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. रस्त्यावरील दगड उचलून कैझाद याच्या डोळ्याला आणि नाकावर मारहाण करून दुखापत केली आहे. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार सोमवारी ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता संशयित आरोपी गौरव अनिल चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल पंकज सपकाळे करीत आहे.