रावेर ( प्रतिनिधी ) – अध्यक्ष रविंद्र पवार अध्यक्ष असलेल्या स्वामी परिवारामार्फत राबविण्यात येत असलेल्या कपडा बॅक ऊपक्रमाअंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबररोजी सातपुड्याच्या कुशित राहत असलेल्या आदिवासी व दुर्गम भागातील मोरव्हाल, जिनसी व सुळ्या बर्डी या भागात कपडे वाटप करण्यात आले
स्वामी परिवारांकडुन रावेर शहरासह जळगाव जिल्ह्यात जुने कपडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत जवळपास 1000 लोकांना पुरतील एवढे वापरण्यायोग्य कपडे स्वामी परिवाराकडे जमा करण्यात आले होते, जमा झालेल्या कपड्यांना स्वामी परिवारातील सदस्यांनी स्वच्छ धुवून इस्त्री करून नविन कपड्यांप्रमाणे पॅकिंग करून गरजू लोकांपर्यंत पोहचविले.
अनेक वर्षापासून स्वामी परिवाकडुन हा उपक्रम राबविला जातो आजपर्यंत सातपुड्याच्या कुशित 13 गावांना वर्षभरातून दोनदा जावून कपडे वाटप केले जाते, कपडा बॅंकेच्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी परिवाराचे राजू पवार, हिरकणी बोरोले, किर्ती कानुगो, साधना बुवा, रुपेश पाटील, विलास महाजन, प्रविण चौधरी, वर्षा साठे, अनिता शिंदे, शेखर वाणी, योगेश पाटील, दिलीप पवार, हरलाल पवार, सुनिल भीलाला, जावेद तडवी यांचेसह सुमारे 150 सदस्य वर्षभर मेहनत घेत असतात.