महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हाचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा आयोजित ९ वा ऋणानुबंध वधुवर व पालक परिचय मेळावाचे फॉर्म आणि कार्यक्रम पत्रिका प्रकाशन सोहळा दि. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्था, जुने एम्प्लॉयमेंट ऑफिस समोर आयोजित करण्यात आला आहे.
अहिर सुवर्णकार महिला मंडळाचे पदाधिकारी, मेळावाचे सहयोगी सदस्य, पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य व उपस्थित महिला यांच्या हस्ते नवरात्रीच्या पावन शुभ मुहूर्तावर हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण सुवर्ण समाजातील स्त्री शक्तीच्या व मान्यवर भगिनींच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.