जळगाव तालुक्यातील दापोरा येथे पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने सुरा घेऊन फिरणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयिन मुलावर कारवाई करत सुरा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवार दि. २ जून रोजी तालुक्यातील दापोरा येथे करण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोरा येथे गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने एक अल्पवयीन मुलगा सुरा घेऊन फिरत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्या वेळी तेथे पोलिस कर्मचारी पोहचले असता १६ वर्षीय मुलगा सुरा घेऊन फिरत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून सुरा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोहेकॉ संजय भालेराव यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहेत.