भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ शहरातील गणेश कॉलनी, जळगाव रोड परिसरात राहणाऱ्या विनोद पंडित बाविस्कर (वय ५८) यांनी राहत्या घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद बाविस्कर हे रिक्षाचालक होते. कुटुंबीयांनी त्यांना घरातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २७/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ते काही काळापासून वैयक्तिक अडचणींमुळे मानसिक तणावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, आत्महत्येचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार हर्षा चौधरी करीत आहेत.