शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

आडगाव शिवारातील घटना
जळगाव प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील आडगाव शिवारात ५ नोव्हेंबर रोजी शेतकरी मोहन धनराज महाजन (वय ५८) यांनी स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर त्यांना तात्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.









