खेडी खुर्द परिसरात तरुणाची आत्महत्या

जळगाव, प्रतिनिधी : खेडी खुर्द परिसरात राजेश रामू बिराडे (वय २३) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी घडली.
घटनेनंतर राजेश याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशील चौधरी करीत आहेत.









