
यावल तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार साहेबांचे विद्यार्थ्यांनी मानले आभार
यावल ( प्रतिनिधी ) : यावल तालुक्यातील विद्यार्थ्यांना मैदानी सरावासाठी जागेची अडचण भासत असताना आमदार अमोलदादांनी पुढाकार घेत एसटी महामंडळाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात ग्राउंड उपलब्ध करून दिले आहे. आमदार साहेबांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे विद्यार्थ्यांना सरावासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली असून, त्यांच्या अडचणीवर तात्पुरता तोडगा निघाला आहे.मैदानाअभावी विद्यार्थ्यांच्या सरावात अडथळे निर्माण होत होते. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सरावासाठी जागा मिळावी यासाठी आमदार अमोलदादांनी सहकार्य केले. त्यांच्या या निर्णयामुळे यावल तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.दरम्यान, ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आमदार साहेबांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल घेत प्रत्यक्ष सहकार्य केल्याबद्दल आमदार अमोलदादांचे विद्यार्थ्यांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या क्रीडा भवितव्याला चालना देण्यासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच महत्त्वपूर्ण मानला जात असून, विद्यार्थ्यांनीही या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.









