चाळीसगाव ;- मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा सण म्हणजे रमजान ईद या निमित्त येथील सुमित भोसले युवा मंचच्या वतीने मुस्लिम बांधवांना दि १३ रोजी शहरातील जहागीरदार वाडी ( हमालवाडी ) येथे काचेच्या बाऊल चे वाटप करण्यात आले.
मुस्लिम बांधव रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करतात जवळपास महिनाभर काहीही न खाता पिता उपवास पकडले जातात त्यानंतर ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मुस्लिम बांधवांचा या पवित्र रमजानपर्वा निमित्त सुमित भोसले युवा मंचच्या वतीने शहरातील जहागीरदारवाडी ( हमालवाडी ) येथे दि १३ रोजी मुस्लिम बांधवांना प्रत्येकी एक डझन काचेच्या वाट्यांचा (बाऊल) संच वाटप करण्यात आला.
. शहरात वर्षानुवर्षे ईदगाह मैदान, तसेच शहरातील मशिदींमध्ये लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज अदा करतात. यंदा मात्र ईदवर कोरोनाचे सावट असल्याने या वर्षी मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा करून साधे पणाने ईद साजरी केली.
बाऊल वाटप प्रसंगी मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त सुमित भोसले युवा मंच व बारे मदिना ग्रूप,राजे छत्रपती ग्रूप,मराठा रियासत ग्रूपच्या वतीने शुभेच्छा देत हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.