जळगाव ( प्रतिनिधी ) ;- मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यामुळे आज जिल्ह्यातील मराठा समाजाची बैठक घेण्यात आली असून यात मराठा समाजातील प्रतिनिधींनी आपापली भूमिका जिल्हा बैठकीत मांडली . आज जळगाव शहरातील नुतन मराठा कॉलेजमध्ये मराठा समाजाची जिल्हा बैठकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर , अँड विजय पाटील, संजय पवार, विनोद देशमुख, अँड सत्यजित पाटील, रवी देशमुख ,देवेंद्र मराठे ,नंदु आप्पा पाटील, हेमंतकुमार साळुंखे, दिपक सुर्यवंशी, अँड सचिन पाटील, पियुष पाटील, सुशिल शिंदे, मिलिंद सोनवणे, रवी पाटील, केतन पाटील, पराग पाटील, आदी उपस्थित होते . कोरोनामुळे कायदा सुव्यवस्था राखावी लागणार असून ज्याप्रकारे समाजाने संयमाने आंदोलने केली. त्याच प्रकारे आगामी काळात समाजाला आपली भूमिका ठरवावी लागणार असल्याचे मत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी बोलताना व्यक्त केले . या बैठकीत संजय पवार , विनोद देशमुख, अँड सत्यजित पाटील, नंदु आप्पा पाटील आदींनी आपापली भूमिका विषद केली .