चाळीसगाव प्रतिनिधी – पत्नीला शिवीगाळ का करतो असे बोलल्याचा राग येऊन घरात येऊन एकाने शिवीगाळ करत हातावर लोखंडी सळई मारून जखमी केल्याची घटना दि 29/12/2020 रोजी शहरातील रामदेवबाबा नगर मेहतर कॉलनीत सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी चाळीसगाव न पा चे सुलभ शौचालय देखभाल करणारे चेतन ओंकार बागरे (28) रा रामदेवबाबा नगर मेहतर कॉलनी जुना पॉवर हाऊस शेजारी चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि 29/12/2020 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्याचे वडील घराच्या मागे बकऱ्याना चारा खाऊ घालत असताना शेजारी राहणारा आरोपी राज उर्फ चिंग्या अजित बेग रा रामदेवबाबा नगर मेहतर कॉलनी जुना पॉवर हाऊस शेजारी चाळीसगाव याची पत्नीला तो मारहाण करीत असताना तू मारहाण का करतो असे बोलल्याचा राग येऊन चेतन बागरे यांच्या पत्नीला शिवीगाळ केली असता त्यास फिर्यादी व त्याचे वडील ओंकार बागरे यांना शिवीगाळ करत भिंतीवरून उडी मारून आरोपी राज बेग घरात आला व त्याच्या हातातील लोखंडी सळई हाताच्या करंगळीवर मारून जखमी केले याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







