पहूर, ता. जामनेर :– तालुक्यातील सोनाळा,येथे २५ वर्षीय युवकाने आपल्याच शेतामध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. निलेश उर्फ भूषण सदाशिव पाटील असे युवकाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश उर्फ भुषण सदाशिव पाटील (२५, सोनाळा, ता. जामनेर) हा गोंधखेड शिवारातील स्वतः च्या शेतात शेती कामासाठी गेला होता. दुपारी १२ वाजेच्या सुमारास गळफास झाडाला लावल्याचे शेजारी ल शेतकऱ्यांना निदर्शनास आले, याची माहिती पोलिस पाटील संजय पाटील यांना मिळाली. घटनास्थळी सरपंच रघुनाथ पाटील, सुरेश पाटील, नाना पाटील व ग्रामस्थ उपस्थित झाले होते. त्यांनी निलेशला पहुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉ. संदीप कुमावत व डॉ. जितेंद्र वानखेडे यांनी मृत घोषित केले. रुग्णालय आवारात मयताच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने पोलीस निरीक्षक राहूल खताळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, विनय सानप, गोपाळ माळी, जितेंद्र परदेशी, ईश्वर देशमुख, राम ढाकरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला.
दरम्यान रविवारी रात्री सोनाळा येथील अल्पवयीन युवकाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली असून अल्पवयीन युवक हा अल्पवयीन मुलीला घेऊन मयत निलेश उर्फ भुषण सदाशिव पाटील याची दुचाकी घेऊन पसार झाल्याचे माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. निलेश हा गरिब परिस्थितील युवक असून आई ,वडील, लहान भाऊ ,आजी परिवाराचा सांभाळ करणारा घरातील कर्ता मुलगा होता.