मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) ;- स्व. निखिल भाऊ खडसे यांच्या स्मरणार्थ कोविड केअर सेंटर ,उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तसेच कोरोनावरील लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगरच्या वतीने करण्यात आली.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्षा तथा संवेदना फाऊंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश राणे, बाजार समिती सभापती निवृत्ती भाऊ पाटील, माजी सभापती राजु माळी, माजी सरपंच प्रविण पाटील, नगरसेवक निलेश शिरसाट,राजुभाऊ कापसे, चेतन राजपुत,मयुर महाजन, अक्षय पालवे उपस्थित होते.