जळगावात उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) :- सोयगाव तालुक्यातील एका इसमाने विषप्राशन केल्यामुळे त्याला गुरुवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. याप्रकरणी सोयगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
सदाशिव उखर्डू जाधव (वय ४०, रा. कंकराळा ता. सोयगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. त्याने गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११. ३० वाजता राहत्या घरी काहींतरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला नागरिकांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी सोयगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.