भुसावळ (प्रतिनिधी ) ;– शहरातील एका परिसरात राहणाऱ्या तरुणीचे इन्स्टाग्रामवर फोटो टाकून बदनामी केल्याची धक्कादायक घटना बुधवार ३ जुलै रोजी रात्री १२.३० वाजता उघडकीस आला असून याप्रकरणी सायंकाळी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला . तसेच एकाला अटक करण्यात आली असून नदिम शेख रा. पटेल कॉलनी, भुसावळ असे संशयित आरोपीचे नाव आहे.
भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. पिडीत तरूणीसोबत असलेला फोटो संशयित आरोपी नदीम शेख रा. पटेल नगर, भुसावळ याने त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला पाठविला. हा प्रकार बुधवार ३ जुलै रोजी रात्री १२.३० वाजता घडल्याची माहिती पिडीत तरूणीच्या लक्षात आले. पिडीत तरूणीने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानुसार संशयित आरोपी नदीम शेख रा. पटेल नगर, भुसावळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . तपास सपोनि किशोर पवार हे करीत आहे.