खामगावला वृद्धेची सोन्याची पोत चोरल्याची घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सोन्याची पोत चोरणाऱ्या जळगावच्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने अटक केली आहे. त्याला पुढील कार्यवाहीसाठी खामगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे (वय ३१, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे या चोरट्याचे नाव आहे. खामगाव येथील शिवाजीनगर भागात शोभा सुभाष खैरे (वय ६५) या महिलेची २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून पसार झाल्याप्रकरणी ११ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या माहितीवरून संशयित प्रशांत उर्फ चोर बाप्या याला सुप्रीम कॉलनी येथून पोलिसांनी अटक केली आहे. त्याला खामगावचे पोहेकॉ निलसिंग चव्हाण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोउनि दीपक जगदाळे, परिविक्षाधीन पोउनि अशोक काळे, सफौ अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, योगेश बारी, विकास सातदिवे आदींनी केली आहे.