आमदार सांस्कृतिक महोत्सवाचा थाटात समारोप, विजेत्यांना पारितोषिक वितरण
जळगाव (प्रतिनिधी) : जळगावची सांस्कृतिक भूमी टिकून रहायला हवी. सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे काम बालपणापासून करण्याचे काम महोत्सव करत असते. काळानुसार सर्व बदलते. मामाचे काम हट्ट पुरवण्याचे असते आणि आ. राजूमामा हट्ट पुरवण्यास कधीही मागे पुढे पाहत नाही. भविष्यात देखील आपण सर्वांनी आ.राजुमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन खा.स्मिता वाघ यांनी केले.
आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) आयोजित आपल्या जळगाव शहराचा सांस्कृतिक उत्सव “आमदार सांस्कृतिक महोत्सव २०२४” चा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा दि.२५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घेण्यात आला. प्रसंगी व्यासपीठावर खा.स्मिता वाघ, आ.राजुमामा भोळे, हास्य जत्रा फेम कलाकार प्रा.हेमंत पाटील, माजी महापौर सीमा भोळे, माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, जितेंद्र मराठे, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकी पाटील, गायत्री राणे, निला चौधरी, दीप्ती चिरमाडे, माजी कृषी अधिकारी अनिल भोकरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी केले. कलाकार प्रा.हेमंत पाटील म्हणाले, सांस्कृतिक महोत्सव गरजेचे आहे. आपल्यावर मायेच्या ममतेने राजुमामांनी प्रेम केले. मामांनी महोत्सव दरवर्षी घ्यावा अशी विनंती प्रा.हेमंत पाटील यांनी केली असता आ.भोळे यांनी ते लागलीच जाहीर केले. प्रा.पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा देत दरवर्षी या पर्वणीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
आ.राजूमामा भोळे म्हणाले की, सध्याच्या युगात गुणांची स्पर्धा लागली आहे. पालकांनी विद्यार्थ्यांमधील गुण कला ओळखून त्याला वाव द्यायला हवा. नेहमी सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा. स्पर्धेत विजय पराजय होत असतो मात्र स्पर्धेत भाग घेणे आवश्यक असते. कारण एकाच्या सहभागाशिवाय दुसरा स्पर्धेक विजयी होऊ शकत नाही, असे आ.भोळे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले.यानंतर विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी मनोज भांडारकर, शैला चौधरी, ललित बडगुजर, अजित राणे, गजानन वंजारी, मिलिंद चौधरी, रेखा कुलकर्णी, विनोद मराठे उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल
रांगोळी
तृतीय – सीमा भारंबे व वैशाली
द्वितीय -समय चौधरी
प्रथम – माधुरी हितेश बारी
मेहंदी
तृतीय – योगेश सपकाळे
द्वितीय -प्रियांका प्रवीण सूर्यवंशी
प्रथम -प्राजक्ता तायडे
पाककला
गोड पदार्थ
तृतीय:- छाया अशोक वाघ
द्वितीय :- उल्का दिनानाथ पारे
प्रथम :- नेहा अजय झोपे
* तिखट पदार्थ
तृतीय:- सीमा सुधीर पाटील
द्वितीय :- सुरेखा संतोष परदेशी
प्रथमः – जान्हवी गजानन महाजन
साडी पेहराव वेशभूषा
१ नंदिनी ग्रुप
२ माहेर महिला मंडळ
३ रणरागिणी ग्रुप
४ जिजाऊच्या लेकी महिला ग्रुप
५ पोलीस वाइफस ग्रुप
चित्रकला
खुला गट –
प्रथम :- समय अजय चौधरी
द्वितीय:- सुप्रिया नवालसिंग राठोर
तृत्तीय : माहेश्वरी डी. भोई
5th to 8th
प्रथम :- संजीवनी दिवाकर काळस्कर
द्वितीयः काव्या राजेश वॊलडिया
तृतीय :- दिव्यश्री महेश बोरसे
1st to 4th
प्रथम :- प्रेक्षा बी. पाटील.
द्वितीय :- गगन राहूल पाटील.
तृतीयः- स्वारा शिवानंद वारले
एकल नृत्य (लहान गट ८ वर्षा खालील)
3. तृतीय- नायरा तडवी
4. द्वितीय – काव्या साळी
5. प्रथम – शेख सिरीन
एकल नृत्य (वयोगट ८ते १५ )
3. तृतीय – हंसिका झांबरे
4. द्वितीय – आस्था कदम
5. प्रथम – हेमांगी निकम
एकल नृत्य (खुला गट )
3. तृतीय प्रज्ञा तायडे
4. द्वितीय संकेत वरुलकर
5. प्रथम सागर वरपे
लक्षवेधी पारितोषिक
① अनिशा चौधरी
② गार्गी साळी
③ दिपीका ठाकूर
बालनाट्य
संगीत स्पर्धा
प्रथम- मारुतीची जत्रा- निर्मल राजपूत, मोहित सोनवणे
द्वितीय- गाठोड्याच गुपित- अथर्व रंधे
तृतीय-अनइंस्टाल- पियुष भूक्तार
रंगभूषा वेशभूषा स्पर्धा
प्रथम- मारुतीची जत्रा – श्री ज्ञानेश्वर सोनवणे
द्वितीय- द बटरफ्लाईज – दीपा, पौर्णिमा, शिवानी, पूजा, भाविका
तृतीय- गाठोड्याच गुपित- दिशा ठाकूर.
नेपथ्य स्पर्धा
प्रथम- मारुतीची जत्रा – श्री अरविंद बडगुजर
द्वितीय- आई मला छोटीशी बंदूक देना – प्रज्वल बोरसे
तृतीय- द बटरफ्लाईज – अनिल चौधरी विद्या अय्यर
प्रकाश योजना
प्रथम- मारुती ची जत्रा- प्रथमेश जोशी
द्वितीय- आई मला छोटीशी बंदूक देना – निलेश भोई
तृतीय- द बटरफ्लाईज – सतीश चौधरी, मुकेश चौधरी
अभिनय (स्त्री)
प्रथम- शर्मा जोशी
द्वितीय- निर्गुणी बारी
तृतीय- भार्गवी पवार
अभिनय (पुरुष)
प्रथम- प्रणित जाधव
द्वितीय- ललित पवार
तृतीय- यश भारी
दिग्दर्शक
प्रथम – मारुतीची जत्रा – हनुमान सुरवसे
द्वितीय- द बटरफ्लाईज – कविता पडलवार
तृतीय- गाठोड्याच गुपित – स्वप्निल गायकवाड
बालनाट्य सांघिक
प्रथम- मारुतीची जत्रा – अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव
द्वितीय- द बटरफ्लाईज – सेंट टेरेसा स्कूल जळगाव
तृतीय- गाठोड्याच गुपित – गुजरात फाउंडेशन.
समूहनृत्य वेस्टन डान्स स्कूल ग्रुप
प्रथम- सेंट टेरेसा स्कूल
द्वितीय- ड्रीम डान्स ग्रुप
तृतीय- एस एल चौधरी स्कूल ग्रुप
समूहनृत्य वेस्टन डान्स खुला गट
प्रथम- द गॅंग ऑफ डी डी एस
द्वितीय- रायसोनी कॉलेज ग्रुप
तृतीय- वॉरियर्स डान्स ग्रुप
समूह गायन शालेय गट
प्रथम- ओरियन सीबीएससी स्कूल
द्वितीय- पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल
तृतीय- आर आर विद्यालय
समूह गायन खुला गट
प्रथम- सुर सप्तक
द्वितीय- मु जे महाविद्यालय
तृतीय- स्वर सुरेल
लोकगीत गायन
प्रथम- अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल
लोकनृत्य (खुला गट)
प्रथम- नूतन मराठा महाविद्यालय
द्वितीय- जान्हवी महाजन
लोकनृत्य (शालेय गट)
प्रथम- अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल
द्वितीय- का. ऊ कोल्हे विद्यालय जळगाव
तृतीय- रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल
पथनाट्य
प्रथम- एस एल चौधरी इंग्लिश मीडियम स्कूल (पर्यावरण शाळा)
द्वितीय- अनुभूती स्कूल
तृतीय- सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल
लेझीम (मोठा गट)
प्रथम- तरुण कुढापा मंडळ
द्वितीय- श्रीकृष्ण मित्र मंडळ गवळीवाडा
तृतीय- जाणता राजा जय श्रीराम पथक
ढोल ताशा
सर्वोत्कृष्ट – युवा गर्जना पथक
सर्वोत्कृष्ट- विश्व गर्जना पथक
सर्वोत्कृष्ट- शिव तांडव पथक
उत्कृष्ट- शौर्यवीर पथक
उत्कृष्ट- पालखी ग्रुप.