• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

धरणगाव तालुक्यात शोककळा

धरणगाव (प्रतिनिधी):- साळवा येथून दुचाकीने जळगावकडे येत असलेल्या एका ७५ वर्षीय वृद्धाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पथराड फाट्याजवळ घडली. सतीश काशीनाथ जोशी (वय ७५, मूळ रा. साळवा नांदेड, ता. धरणगाव) असे मृत वृद्धाचे नाव आहे. जोशी हे सध्या जळगाव येथील एसएमआयटी कॉलेजजवळील शिनू बंगलो येथे वास्तव्यास होते.

मुलीकडे जाताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, सतीश जोशी हे शुक्रवारी दुपारी साळवा येथून आपल्या मुलीला भेटण्यासाठी जळगावकडे दुचाकीने जात होते. पथराड फाट्याजवळ आले असता, त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, जोशी यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांची तत्परता आणि प्रामाणिकपणा
अपघाताची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कंडारे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. विशेष म्हणजे, पंचनामा करताना मृत जोशी यांच्या खिशात १५ हजार रुपयांची रोकड आढळून आली. ही रक्कम पोलिसांनी प्रामाणिकपणे त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केली.

कुटुंबीयांवर शोककळा
या अपघातामुळे जोशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा मोठा परिवार आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


 

 

Tags: pthrad-fatyajaval-aapghat-ek-thar
Previous Post

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

Next Post

भुसावल विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावल विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान

भुसावल विभागात विशेष तिकीट तपासणी अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

सुरत येथील अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील फरार आरोपी फत्तेपूर पोलिसांच्या जाळ्यात

August 25, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

सावदे येथील सरपंचांच्या घरातून रोख रकमेसह २० तोळे सोन्याचे दागिने लंपास; परिसरात खळबळ

August 25, 2026
गर्भलिंग तपासणीच्या तक्रारीनंतर जळगावातील आर्या हॉस्पिटलवर कारवाई; सोनोग्राफी मशीन सील
1xbet russia

गर्भलिंग तपासणीच्या तक्रारीनंतर जळगावातील आर्या हॉस्पिटलवर कारवाई; सोनोग्राफी मशीन सील

August 25, 2026
कोर्टाच्या आवारात संशयित आरोपीला मोबाईलवरुन बोलू देणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा
Uncategorized

खेडी बुद्रुक चाकू हल्ला प्रकरणात एक दोषी; सहआरोपींची निर्दोष मुक्तता

August 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

सुरत येथील अमली पदार्थांच्या गुन्ह्यातील फरार आरोपी फत्तेपूर पोलिसांच्या जाळ्यात

August 25, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

सावदे येथील सरपंचांच्या घरातून रोख रकमेसह २० तोळे सोन्याचे दागिने लंपास; परिसरात खळबळ

August 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon