भुसावळ ( प्रतिनिधी ) – चंदिगड येथील मोहाली येथील नायपर या संस्थेत एमएस इन फार्मोकोलॉजी अॅण्ड टॉक्सीकोलॉजी साठी कु.सृष्टी बेंडाळे हिचा प्रवेश निश्चित झाला असून येत्या ८ सप्टेंबर रोजी ती रवाना होत आहे. त्यानिमित्त सृष्टीने आज गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील सर, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. सृष्टीच्या यशाचे कौतुक करुन भावी वाटचालीसाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्यात.
एमएस प्रवेशासाठी सृष्टी हिने जीपॅट, नायपर आणि गेट या परिक्षा दिल्यात असून त्यात चांगल्या गुणांनी तिने यश प्राप्त केले आहे. देशभरातील २६ विद्यार्थ्यांमध्ये भुसावळची सृष्टी बेंडाळे हिचा समावेश आहे. सृष्टी ही भुसावळ येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलची माजी विद्यार्थीनी आहे. तसेच डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयाच्या इएसआयसी विभागातील सौ.प्रतिभा बेंडाळे व श्री महेश बेंडाळे यांची ती कन्या आहे.