कुलभूषण पाटील, उज्ज्वला कुलभूषण पाटील यांना विजयी करण्याचा नागरिकांचा निर्धार
जळगाव ( प्रतिनिधी ) – निवडणुकीचे वारे वाहत असतानाच प्रभाग क्रमांक १० ड मधील उमेदवार कुलभूषण पाटील आणि प्रभाग ८ (अ) मधील उमेदवार उज्वला कुलभूषण पाटील यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. गुरुवारी काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला, ज्यामुळे परिसरात भगवेमय वातावरण पाहायला मिळाले.


या प्रचार रॅलीची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. रॅलीने खंडेराव नगर, भैरव नगर आणि मयूर कॉलनी या भागांमध्ये फेरफटका मारला. ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण केले, तर तरुणांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. नागरिकांशी थेट संवाद साधत उमेदवारांनी जनसंपर्क अधिक दृढ करण्यावर भर दिला. या रॅलीत शिवसेनेचे अनेक दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यामध्ये विनोद निकम, विकास चौधरी, आसिफ शेख, पंकज पाटील, राहुल पाटील, दीपक पवार, सागर सोमानी, विजय निकम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी या रॅलीत सहभाग नोंदवून शक्तीप्रदर्शन केले. प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि विकासाला गती देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे यावेळी उमेदवारांनी सांगितले. नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता, या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) जोरदार मुसंडी मारणार असल्याचे चित्र दिसत आहे.










