खा. स्मिता वाघ यांच्या हस्ते भूमिपूजन, ध्वजारोहण
जळगाव (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळा पार पडला त्या अनुषंगाने विश्वातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित श्री शिवचरित्र साहित्य संमेलन २६ जून ते २९ जून २०२४ रोजी नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे होणार आहे. संमेलनाच्या छत्रपती शिवाजी महाराज नगर उभारणीस खा.स्मिता वाघ यांच्या हस्ते भूमिपूजन व ध्वजारोहण करून सुरुवात करण्यात आली. रायगड, राजगड ,पुरंदर, सिंदखेडराजा, आणि वेरूळ या किल्यावरुन आणलेल्या मातीच्या कलशाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून भूमिपूजन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आ. सुरेश भोळे, प्राचार्य लक्ष्मणराव देशमुख, सहकार भारतीचे दिलीप पाटील, गिरीष महाजन, गुलाबराव पाटील, माजी आ. मनीष जैन, माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी, प्रा.सुरेश कोळी (भडगाव), प्रा आर बी देशमुख, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.के. बी. पाटील, इतिहास प्रबोधन संस्थेकडून सचिव भारती साठे, रवींद्र पाटील, दिनेश नाईक, आदित्य धर्माधिकारी, नूतन मराठा महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.