शिरसोलीच्या शिरपेचात मनाचा तुरा
शिरसोली (वार्ताहर) : माध्यमिक शिक्षण विद्या मंडळ, शिरसोली संचलित बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीमध्ये येऊन घवघवीत यश संपादन केले.
पायल सुनिल बारी, पल्लवी रविंद्र अस्वार, भूमिका स्वप्निल पाटील, रूपाली रामभाऊ गवळी या विद्यार्थिनींचा संस्थेचे अध्यक्ष अशोक अस्वार, उपाध्यक्ष दिलीप बारी, सचिव सुरेश अस्वार, शालेय समितीचे चेअरमन कमलाकर तांदळे, सदस्य तथा संचालक निलेश खलसे, प्रवीण पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. तसेच या विद्यार्थ्यांना चंद्रकांत कुमावत, भरत बारी व आकांक्षा निकम या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.