जळगावातील एमआयडीसी परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरापासून जवळ असलेल्या एमआयडीसी परिसरातील प्रवीण ट्रेलर कंपनीत एका प्रौढाचा काम करीत असताना शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली आहे. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
भीमराव धोंडू पाटील (वय ६०, रा. मूळ लमांजन, ह. मु. अशोक नगर, शिरसोली ता. जळगाव) असे मयत प्रौढ इसमाचे नाव आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून पंचरत्न ट्रेलर कंपनीत काम करीत होते. बुधवारी ते कामावर असताना वेल्डिंगचे काम करीत होते. अचानक त्यांना विजेचा धक्का बसून दूर फेकले गेले. कंपनीतील कामगारांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासून मयत घोषित केले.
दरम्यान, मयत भीमराव पाटील यांचे पश्चात पत्नी, ४ भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच त्यांच्या पत्नीने आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.