जळगाव तालुक्यातील घटना, गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली येथील भाजीपाला बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी दि. २ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरूबाई बापूराव गवंदे (वय ५२ रा,. दापोरा ता.जळगाव) या महिला बुधवारी २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता शिरसोली गावातील भाजीपाला बाजारात खरेदीसाठी आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.