जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे हिराबाई पाटील माध्यमिक व जगतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी व व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या प्राचार्य के.पी.पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या के. पी. पाटील होत्या .तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक शालेय समिती चेअरमन प्रमोद जगतराव पाटील हे उपस्थित होते. जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महात्मा गांधींच्या जीवनावर प्रकाश टाकला.
त्यांनी आपल्या मनोगत सांगितले की, धर्म आणि जातीच्या आधारावर समाजात कोणाशीही भेदभाव केला जाऊ नये. सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे. महिलांचा आदर केला पाहिजे. शिक्षकांमधुन मनीषा पाटील यांनी मनोगतात माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीची विद्यार्थीनी भावना पाटील यांनी केले तर आभार सोनाली पाटील यांनी मानले.