जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षिका सुरेखा दुबे, ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण पाटील, अशोक बावस्कर, आशा कोळी हे होते. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक घन:श्याम काळे यांनी केले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गीत सादर केले.
प्रमुख अतिथी रामकृष्ण पाटील यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्षीय भाषणात महात्मा गांधींचे जीवन प्रवास सत्य व अहिंसा यावर मनोगत व्यक्त केले. नंदा अकोले व कांचन धांडे यांनी वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण केले. प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवका पाटील यांनी केले तर आभार नेत्रा वाणी यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते.