जळगांव ( प्रतिनिधी ) – सुधर्मा ज्ञानसभा गीता अभ्यासातून समाजाला एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नुकताच शिरसोली प्र.बो. या गावातील जुन्या दक्षेश्वर महादेव मंदिरात गीता अभ्यास करुन घेण्यात आला.
सुरवातीला सुधर्माचे अध्यक्ष हेमंत
बेलसरे यांचे हस्ते महादेवाचे पुजन करण्यात आले. यावेळी उपस्थित लक्ष्मण खलसे व रमेश बारी यांनी हे मंदिर जुने असून मंदिराचे बाहेर नंदिसोबत मेंढ्याची देखील स्थापना केलेली असलेले एकमेव मंदिर आहे अशी माहिती दिली.
यावेळी गीतेचा १५ वा अध्याय याचे वाचन करण्यात आले. तसेच अर्थ समजावून देण्यात आला. श्रीकृष्ण भगवान हेच पुर्ण पुरुषोत्तम असून त्यांना शरण गेल्यामुळे मानवाचा निश्चित उद्धार होतो. या जगातील खरे चलन कर्म हेच आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक कर्मात शुद्धता ठेवावी. अशुद्ध कर्मे टाळावीत. रोजच नामस्मरण करावे, असे आवाहन हेमंत बेलसरे यांनी केले.
यावेळी भाग्यश्री धनगर, सुशिलाबाई अस्वार, दिपाताई देसले या महिलांना सुधर्माचे वतीने गीता भेट म्हणून देण्यात आली. गीता अभ्यासामध्ये लक्ष्मण विठ्ठल खलसे, रमेश माळी, कडुबूवा गुरव, मधुकर बारी, विजय बारी, नीता कोळी, वैशाली कोळी, निर्मला कोळी, मंगलाबाई पाटील, वैशाली बारी, भागाबाई बारी, दिपाताई बारी यांनी सहभाग घेतला. रविंद्र नेटके यांनी गावाचे वतीने आभार मानले.